'ज्ञानसिंधू प्रबोधिनी'च्या अनुजा देसाईची दंत सहायकपदी निवड !

Edited by: ब्युरो
Published on: April 01, 2024 08:18 AM
views 247  views

सावंतवाडी : ज्ञानसिंधू प्रबोधिनी, सावंतवाडीच्या अनुजा सुभाष देसाई यांची दंत सहायक, सिंधुदुर्ग (OPEN WR RANK-3) पदी निवड झालीय. ज्ञानसिंधू प्रबोधिनी, सावंतवाडीच्या यशाची परंपरा तिने कायम ठेवली आहे. 

महाराष्ट्र सरकारच्या 75000+ सरळसेवा भरतीअंतर्गत झालेल्या आरोग्य विभागातील दंत सहायक पदावर निवड झाली. यात तिला  ज्ञानसिंधू प्रबोधिनी सावंतवाडीचं मार्गदर्शन लाभलं. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. ज्ञानसिंधू प्रबोधिनी सावंतवाडी स्पर्धापरीक्षांसाठी तयारी करून घेते. मेहनत, जिद्द, सराव आणि सोबतीने ज्ञानसिंधू प्रबोधिनीचे मार्गदर्शन मिळाल्यास स्पर्धा परीक्षेत तुम्हीही यश मिळवू शकता. अधिक माहितीसाठी 9309139284, 9422641309 या क्रमाकांवर संपर्क साधू शकता.