
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील मोठी प्रश्नाला म्हणून ओळखल्या जाणारया न्यू इंग्लिश स्कूल भेडशी हायस्कूलचा यावर्षीचा दहावीचा निकाल 97.56 टक्के लागला आहे. हायस्कूलमध्ये अनंत जयवंत शिंदे याने 87.07टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकाविला आहे.
तर सौम्या मणेरकर हिने 84.40 व साक्षी घोगळे हिने 83.80 टक्के गुण मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. प्रशालेतून यावर्षी 41 विद्यार्थी परिक्षेस बसले होते पैकी 40 उत्तीर्ण होऊन निकाल 97.56 टक्के इतका लागला. 20 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे.
या गुणवान विद्यार्थ्यांचा संस्था अध्यक्ष्या श्रीम. सीमा तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर , सचिव श्रीम. कल्पनाताई तोरसकर , खजिनदार श्री. वैभव नाईक, तसेच सर्व संस्था पदाधिकारी, तसेच समन्वय समिती सचिव रश्मीताई तोरसकर आणि सहसचिव तथा प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नाईक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, समन्वय समितीचे सदस्य, शालेय समितीचे सदस्य, शिक्षक पालक संघ, आजी-माजी विद्यार्थी व ग्रामस्थ आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.