सावंतवाडीत डास प्रतिबंधक फवारणी गरजेची

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने वेधलं लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: February 11, 2025 13:21 PM
views 148  views

सावंतवाडी : शहरामध्ये डासांचे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्यामुळे शहरातील जनता त्रस्त झालेली आहे. काही महिन्यान पूर्वी ठराविक ठिकाणी डास प्रतिबंधक फवारणी केली होती. परंतु, काही भाग वंचित राहिला. सध्यस्थितीमध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण आजारांना निमंत्रण देणारे ठरणार आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक वार्ड मध्ये जाऊन डास प्रतिबंधक फवारणी होणे गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे हॉस्पिटल परिसर, बस स्टॅन्ड, मोती तलाव काठ, बाजारपेठ, शहरातील हॉटेल परिसर, सार्वजनिक स्वच्छतागृहे, शासकीय कार्यालये या ठिकाणी देखील डास प्रतिबंधक फवारणी करणे आवश्यक आहे. नगरपालिकेने यासाठी लवकरात लवकर डास प्रतिबंधक फवारणी करून शहरातील जनतेला सहकार्य करावे अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रवी जाधव यांनी केली आहे.