सावंतवाडी आयुर्वेद कॉलेजमध्ये अंमली पदार्थ विरोधी दिन

Edited by: विनायक गांवस
Published on: June 25, 2025 21:00 PM
views 13  views

सावंतवाडी : स्व.भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी येथे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक नंबरकर यांनी ''Say No To Drug's Yas To life'' या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

यावेळी त्या म्हणाल्या, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ, दारू, अमली पदार्थ या सर्व व्यसनांचा समाजावर विशेषतः युवकांच्या जीवनावर फार मोठा घातक परिणाम होत आहे. आज  गाव किंवा राज्य नव्हे तर देश पातळीवर व्यसनांना मिळणारी प्रतिष्ठा, व्यसनांना जोडून घेऊन आनंद साजरा करण्याची पद्धत रूढ होताना दिसत आहे. ही प्रथा आपल्या सर्वांसाठी धोक्याची ठरत आहे. यासाठी वेळीच सावध होऊन गाव शहर शाळा महाविद्यालय सार्वजनिक ठिकाणी व्यसनांच्या विरोधात जनजागृती असे विचार अर्पिता मुंबरकर यांनी व्यक्त केले. 

या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ ललितकुमार विठलानी, डॉ शितल पाटील, डॉ रवी गोलघाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ राजेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना अमली पदार्थ मुक्तीची शपथ देण्यात आली.