
कणकवली : जीवनाला हो म्हणा, अंमली पदार्थांना नाही म्हणा ! नको अंमली पदार्थांची नशा, आयुष्याची होईल दुर्दशा ! तुमचे मन स्वच्छ ठेवा, अंमली पदार्थांपासून मुक्त रहा ! अंमली पदार्थ सोडा, मुक्त जीवन जगा ! अशा विविध घोषणा देत नांदगाव येथे दोन दिवस अंमली पदार्थ विरोधी प्रभात फेरी काढण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषीकेश रावले यांच्या सूचनेनुसार कणकवली तालुक्यातही पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी जनजागृती व्हावी यासाठी प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांना याबाबत सुचना देण्यात आली असून याचाच भाग म्हणून आज नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेवून प्रभात फेरी काढण्यात आली.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंगवले, एकात्मिक बालविकास अधिकारी श्रीमती हळदणेकर , विस्तार अधिकारी,नांदगाव वैद्यकीय अधिकारी डॉ देसाई, माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर, ऋषिकेश मोरजकर, हनुमंत उर्फ राजा म्हसकर, हनुमंत वाळके, आरोग्य सहाय्यक श्री कांबळे, सहाय्यीका श्रीमती पवार, सर्व आरोग्य कर्मचारी तसेच प्राध्यापक सुप्रिया मामजी, पुजा मेस्त्री, उत्तम सावंत, पंकज गावकर, सर्व नर्सिंग कॉलेज चे विद्यार्थी सहभागी झाले होते.