नितेश राणे जवाब दो | युवा सेना आक्रमक

युवसेना विधानसभा मतदारसंघात घरोघरी पत्रक वाटून १० प्रश्न जनतेपर्यंत पोचवणार...!
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 05, 2023 16:58 PM
views 611  views

कणकवली : पूर्ण महाराष्ट्रात होऊ दे चर्चा मधून बीजेपी सरकारच्या घोषणांची पोलखोल सुरू आहे. या धर्तीवर स्थानिक आमदार नितेश राणेंना फक्त दहा प्रश्न विचारणार आहोत.यातून नितेश राणेंनी जनतेची केलेली फसवणूक जनतेसमोर आणणार आहोत. यासाठी आमदार नितेश राणेंना विचारणारे 10 प्रश्न कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघात घरोघरी पत्रक वाटून जनतेपर्यंत पोचवणार असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कणकवलीत विजय भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी कणकवली विधानसभा समन्वयक राजू राठोड, उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, अमेय जठार, तेजस राणे, तालुकाप्रमुख वैभववाडी रोहित पावसकर, देवगड  तालुकाप्रमुख गणेश गावकर, फरीद काझी, धीरज मेस्त्री, तेजस राणे, सिद्धेश राणे, बंटी उरणकर, संदेश सुतार, गणेश पवार, सागर गोरुले, रोहित राणे, नंदू परब, प्रदीप घाडी, मयूर दळवी, प्रवीण काडगे, नाईक पुढे म्हणाले, राणे कुटुंबियांचे लाईफ टाईम हॉस्पिटल अद्ययावत होऊ शकते तर कणकवली मतदारसंघातील सरकारी हॉस्पिटल अद्ययावत का झाली नाही ? ए जि डोटर्स झिरो वेस्ट प्रकल्पाचे काय झाले ? केंद्रीयउद्योगमंत्री स्वतःचे वडील असताना युवकांना काय रोजगार दिला ? केवळ प्रहार भवन चा मजला कवायर बोर्डा ला भाड्याने देऊन स्वतः रोजगार कमावला.देवगड शहरासह तालुक्याचा पाणीपुरवठा प्रश्न का निकाली लागू शकला नाही ? गगनबावडा - करूळ  आणि फोंडाघाट रस्त्याच्या दुरावस्थेची जबाबदारी घेणार काय ? राज्यात मुस्लिम समजाला टार्गेट करणारे नितेश राणे स्थानिक हिंदू आणि मुस्लिम बांधवांत तेढ का निर्माण करत आहेत ? राज्यात स्वतःला मराठा समाजाचा नेता म्हणवणाऱ्या नितेश राणेंनी कणकवली शहरातील मराठा मंडळ भवन इमारतीच्या पूर्णत्वाकडे स्वतःचे वडील केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंनी का दुर्लक्ष केले ? औषध आपल्या दारी, रिव्हर राफ्टिंग, मोफत वायफाय, सिंधुडर्ग गाईड सारख्या जाहीर केलेल्या योजना आज सुरू का नाहीत ? असे रोखठोक सवाल सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले. रोज सकाळी घेत असलेल्या पत्रकार परिषदेत या दहापैकी एक एक प्रश्नाचे उत्तर आमदार नितेश राणे यांनी द्यावे असे आव्हान ही सुशांत नाईक यांनी दिले.