
वेंगुर्ले : विशाल परब यांच्या संकल्पनेतून अणसूर येथे साकार झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मायेचे छत्र, निवारा शेडचेे उद्घाटन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, तसेच युवा वर्ग, महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अणसुर हायस्कूल इयत्ता दहावी मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने पास झालेल्या मुलांचा शाल व श्रीफळ देऊन विशाल परब यांच्या हस्ते देऊन गुणगौरव करण्यात आला यावेळी अणसुर देवस्थानचे मानकरी चंद्रकांत गावडे, गोपी गावडे, गणपत गावडे, लक्ष्मण गावडे, देऊ गावडे, आप्पा गावडे, भाजपा कार्यकर्ते बिट्टू गावडे, प्रभाकर गावडे, सिद्धेश गावडे, प्रकाश गावडे, राकेश गावडे, सचिन गावडे, विकास गावडे, जयेश गावडे, जय गावडे, नितीन गावडे, चंदू गावडे, भास्कर गावडे, योगेश गावडे, दीपक गावडे, अर्जुन गावडे, रवी गावडे, शंकर गावडे, मधुकर गावडे, विजय गावडे, विजय सरमळकर, विलास गावडे, तसेच बहुसंख्या ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ यांच्यासाहित ग्रामपंचायत सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य संयमी गावडे, प्रज्ञा गावडे, वामन गावडे, उपस्थित होते .
यावेळी सरपंच सत्यविजय गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विशाल यांचे मनापासून आभार मानले विशाल परब यांच्यासारखे जन सेवेत कायम व्यस्त असणारे युवांचे आयडॉल म्हणून परिचित असणारे नेहमी सहकार्याची भावना आणि मदत यांच्यासारख्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत, तसेच या कार्यक्रमाचे आयोजन आणि कार्यक्रम यशस्वी केला ते सिद्धेश गावडे प्रभाकर गावडे, सचिन गावडे, राकेश गावडे, सिद्धू गावडे, विशाल गावडे, सोनू गावडे यांचे मनापासून आभार व्यक्त केले, तसेच विशाल परब यांनी मनोगत व्यक्त करताना ही तर सुरुवात आहे याही पुढे अणसुर गावासाठी मला जे जे करता येईल त्यासाठी मी सहकार्य करेल, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी असू दे असे सांगत सर्वांन शुभेच्छा दिल्या.