अणसुर प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन !

Edited by: दिपेश परब
Published on: February 01, 2024 10:05 AM
views 241  views

वेंगुर्ला : अणसुर पुर्ण प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राजन तावडे तर स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून अणसुर ग्रामपंचायत सरपंच सत्यविजय गावडे उपस्थित होते.

    यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते आनंद (बिटु) गावडे, देऊ गावडे, प्रकाश गावडे, श्री देवी सातेरी देवस्थान कमिटी अध्यक्ष चंद्रकांत (बाळा) गावडे, मानकरी भाऊ गावडे, ग्रामपंचायत सदस्य सिमा गावडे,  साक्षी गावडे, प्रज्ञा गावडे, सुधाकर गावडे, नारायण ताम्हणकर, मालवणकर, पोलीस मानसी महेश गावडे, शिक्षक श्री माळगावकर आणि श्री सामंत,  पुजा गावडे, अन्नपूर्णा गावडे, अनिषा गावडे, शाळा समिती अध्यक्ष सुनील गावडे, नितीन अणसुरकर, सिद्धेश गावडे, अम्रुत गावडे, वैभव वारंग, संजय अणसुरकर, राकेश गावडे, किशोर राणे, विजय गावडे, सतिश गावडे, अनिकेत ताम्हणकर, अंकुश तेंडोलकर उपस्थित होते. यावेळी राजन तावडे यांचे शाळा समितीच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मानसी महेश गावडे यांची पोलीस दलात बढती झाल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

    अणसुर श्री देवी सातेरी फुगडी ग्रुप च्या वतीने राजन तावडे यांचा  सत्कार करण्यात आला. राजन तावडे व सरपंच सत्यविजय गावडे यांनी मनोगत व्यक्त करताना शालेय मुलांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा चे संपूर्ण आयोजन शालेय समिती अध्यक्ष सुनील गावडे व उपाध्यक्ष अन्नपूर्णा गावडे  अनिषा गावडे, शिक्षक व पालक यांच्यावतीने करण्यात आले. यानंतर मुलांचा कला गुणांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे आपले कला गुणाचे  कौशल्य दाखविले त्यांना गुलाबपुष्प व बक्षीस देऊन गौरवण्यात आले. शाळेतील अंगणवाडी ते सातवीपर्यंत च्या मुलांना राजन तावडे यांच्या कडून  शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले. तसेच अणसुर ग्रामपंचायत उपसरपंच वैभवी मालवणकर यांच्यामार्फत मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. कार्यक्रम चे सुत्रसंचालन माळगावकर सर यांनी केले.