भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या बी ए एम एस पदवी दीक्षांत समारंभात ४० जणांना प्रदान

Edited by: विनायाक गावस
Published on: July 06, 2023 11:23 AM
views 223  views

सावंतवाडी : येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या अमरे बँचचा 2017 च्या दीक्षांत समारंभ महाराष्ट्र राज्याचे आयुष मंत्रालयाचे संचालक रामन धुंगराळेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पदवी प्रमाणपत्र प्रदान महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची अर्थात बी ए एम एस पदवी प्रमाणपत्र 40 जणांना प्रदान करण्यात आले. या दीक्षांत सोहळ्यास, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ सदस्य पंकज विश्वकर्मा, राणी जानकीबाईसाहेब सुतिका गृह रुग्णालय संचलित भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष ऍड. दिलीप नार्वेकर, उपाध्यक्ष विकासभाई सावंत, रमेश पै, डॉ. अभिजित चितारी,विश्वस्त मिलिंद खानोलकर,सचिव बाळासाहेब बोर्डेकर, प्राचार्य विकास कठाणे उपप्राचार्य संजय दळवी, प्रवीणकुमार ठाकरे  डॉ पांडुरंग वझराटकर संचालक गुरू मठकर,रमेश बोद्रे, अमोल सावंत माजी प्राचार्य डॉ दीपक तुपकर आर के गोळघाटे डाँ राजेंद्र पाटील डॉ. ललित  विठलानी डॉ प्रवीण देवऋषी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी प्राध्यापक वैद्य विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

मळगाव येथील हॉटेल शालू च्या सभागृहामध्ये झालेल्या या दीक्षांत सोहळ्यात बोलताना डॉक्टर आणि रुग्णांमध्ये कोणताही प्रकारे चुकीचे वर्तन होऊ नये यासाठी आता डॉक्टर ना पेशंटचीही आँनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. मोह टाळा माणूसकी जपा.यश निश्चित मिळेल. असे आवाहन केले. यावेळी ॲड दिलीप नार्वेकर म्हणाले, भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाची परंपरा नावलौकिक याचा विसर पडू देऊ नका हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात जावे लागले प्रसंगी पदर मोड करून मोठ्या कष्टाने महाविद्यालय सुरू ठेवले असल्याचे ते म्हणाले गुरूला नमस्कार म्हणजे परमेश्वराला नमस्कार असतो. त्यांनी तुम्हाला घडविले.याचा विसर पडू देऊ नका. असेही ते म्हणाले

महाविद्यालयाचे प्राचार्य विकास कठाणे गुरूपौर्णिमेच्या शुभदिनी दिशांत समारंभ होताना आनंद होतो.शिष्यांनी गुरूच्या पुढे एक पाऊल जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ.पांडुरंग वजराठकर यांनी ५० टक्के श्रेय मुलांना घडविण्यात पालकांचे असते.आदर्श डॉक्टर कसा असावा याची उदाहरणे देताना ते म्हणाले डॉक्टर अभिजित चितारी आणि सागर जाधव यांच्या सारखे आदर्शवत काम करा असे आवाहन केले.

डॉ.अभिजित चितारी याने ज्ञानाचा उपयोग करून संयम प्रामाणिकपणे काम करण्याची ताकद हवी.अभ्यास आणि मेहनत करून ज्ञान मिळवा.डॉक्टर नाव सिद्ध करावे लागते यासाठी मेहनत घ्यावी लागेल.असे आवाहन केले.

संस्थेचे सचिव बाळासाहेब बोर्डेकर आजचा दिवस सुवर्ण दिन आहे. भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयांने अनेक विद्यार्थी घडविले.पवित्र कार्य करत असताना संस्थेकडे मागे वळून पहावे असे आवाहन केले.

संस्थेचे उपाध्यक्ष विकासभाई सावंत यांनी भाईसाहेब सावंत यांच्या कार्याचा उल्लेख करत भावी डॉक्टरांना

या काँलेजचे नावोलेख उंच न्या. आता तुमची गाडी टाँप गिअरवर आहे.परंतु माणूसकी जपण्याचा प्रयत्न करा.तो धर्म जपा.निश्चित ध्येय ठेवा आयुष्यात फोकस असला पाहिजे. शाँर्टकट करू नका. असा सल्ला दिला

डॉ. विश्वकर्मा शुभेच्छा दिल्या. यावेळी मनस्वी पाटील,अनुजा गायकवाड,प्राजक्ता चौधरी, तसेच यश पवार आदी 40 विद्यार्थ्यांना बीएएमएस आयुर्वेद वैद्य तथा डॉक्टर ही पदवी प्रदान करण्यात आली. शेवटी पदवी  प्रमाणपत्र प्रदान केल्यानंतर टोप्या उडवण्याच्या कार्यक्रमाला रंगत आली