सावंतवाडी : येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कबीर हेरेकर नेहमीच कौतुकास्पद काम करतो. सर्पमित्र, प्राणी मित्र, पर्यावरण रक्षक म्हणून कबीर याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यात एक नवीन विक्रम केला आहे. अगदी वयाच्या नवव्या वर्षीच त्याने २५ मॅरेथाॅन पुर्ण केलीत. २ फेब्रुवरी रोजी परुळे येथे राधारंग फाऊंडेशन आयोजित स्पर्धेत त्यांने हा टप्पा पार केला. कबीर याने सिंधुदुर्ग, गोवा, मुंबई, पुणे व कर्नाटक येथे अनेक स्पर्धेत सहभाग घेतले आहे. तो ५ किलोमीटर धावतो याशिवाय स्विमिंग, स्केटींग , साइक्लिंग अशा खेळामध्ये ही तरबेज आहे. आज मुलं मैदानी खेळ सोडून मोबाईलच्या विळख्यात अडकत चालली आहेत. पण कबीर मात्र एक वेगळच उदाहरण ठरत आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.