अ.रा.विद्यालयाचं शनिवारी वार्षिक स्नेहसंमेलन !

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 21, 2023 16:33 PM
views 269  views

वैभववाडी : वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शनिवार २३ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.

       
या कार्यक्रमाच उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद रावराणे उपस्थित रहाणार आहेत. या सोहळ्याला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार प्रमोद जठार, प्रांताधिकारी जगदीश कातकर, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष तुलसीदास रावराणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, वैभववाडी तहसीलदार दिप्ती देसाई, जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, युवा उद्योजक सुनील नारकर, गट विकास अधिकारी मनोजकुमार बेहरे, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, संस्थेचे संचालक अर्जुन रावराणे व सर्व संचालक मंडळ तसेच नगरपंचायत वाभवे-वैभववाडीचे सर्व विषय समिती सभापती व नगरसेवक उपस्थित रहाणार आहेत.
       
यंदाचे वार्षिक स्नेहसंमेलन हे फक्त विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थी शिक्षक व पालक या सर्वांसाठी आयोजित केले आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबर पालक वर्गासाठी पाककला स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलन प्रसंगी प्रशालेचे आजी, माजी विद्यार्थी, पालक वर्ग, हितचिंतक यांनी  शिक्षक व पालक यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व मुख्याध्यापक बी.एस.नादकर, स्नेहसंमेलन प्रमुख श्रीम. प्राची सावंत यांनी केले आहे.