कळणे नूतन विद्यालयात उद्या वार्षिक स्नेहसंमेलन

Edited by:
Published on: January 20, 2025 16:33 PM
views 194  views

दोडामार्ग : कळणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कळणे संचलित नूतन विद्यालय व प्राचार्य एम. डी. देसाई कनिष्ठ महाविद्यालयचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी २१ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे.

हा कार्यक्रम प्राचार्य मोहनराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर त्यांच्या सोबत सतीश पाटणकर, माजी पंचायत समिती सदस्य बाबूराव धुरी, उद्योजिका संपदा देसाई, कळणे सरपंच अजित देसाई, आडाळी सरपंच पाराग गावकर, सासोली सरपंच बळीराम शेटये, मोरगाव सरपंच संतोश आईर, पटये सरपंच प्रवीण गवस आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.