NEMS स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन येत्या 10 फेब्रुवारीला

हार्दिक, अक्षया सह ऑरेंज ज्यूस टीमची असणार उपस्थिती
Edited by:
Published on: February 08, 2024 11:42 AM
views 283  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवेचे वार्षिक स्नेहसंमेलन येत्या 10 फेब्रुवारी 2024 ला संपन्न होणार आहे.

विविध कलाविष्काराने नटलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे ती म्हणजे सिनेकलाकार हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर- जोशी यांची  तसेच सिनियर पोलिस अधीक्षक कांतीलाल कोथिंबिरे आणि ऑरेंज ज्यूस टिम  मुंबईतील कलाकार उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा व विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचे प्रकटन करणारा हा कार्यक्रम असणार आहे.

हा कार्यक्रम 10 फेब्रुवारी 2024 रोजी नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पटांगणावर होणार असून या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहावे, व या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ,व तो अधिक रंगतदार करावा. यासाठी आदर्श एज्युकेशन सोसायटीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपणास आमंत्रित केले आहे.