शिरगांव हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 12, 2025 11:33 AM
views 128  views

देवगड : शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संस्थाध्यक्ष अरुण कर्ले यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख पाहुणे म्हणून कवी व गीतकार प्रसाद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत १२ डिसेंबरला होणार आहे. यानिमित्त विविध कायक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात सकाळी ८.३० वा. फनी गेम्स आणि फूडस्टॉल उद्घाटन, ८.४५ वा. रांगोळी प्रदर्शन, ९ वा. खुल्या पाककला स्पर्धा, १० वा. अल्पोपहार, १०.३० वा. अरुणोदय हस्तलिखिताचा प्रकाशन सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन, सायंकाळी ६ वा. विद्यार्थी विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांना संस्था पदाधिकारी, संचालक, सभासद, हितचिंतक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.