
कुडाळ : कुडाळ तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सरकारी पतसंस्था मर्यादित कुडाळ पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली आहे. कुडाळ येथील मराठा हाॅल येथे चेअरमन चंद्रकांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. यावेळी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन विलास पालकर, विद्यानंद पिळणकर, गिरीष राऊळ, सुजित गंगावणे, दिनेश म्हाडगुत, निखील आरोलकर, उमेश सावंत, दिपक तारी, सुनिल नाईक, अनिल वारंग, श्रद्धा कुलकर्णी, अंकिता मोडक, गिरीश गोसावी, तज्ञ संचालक नारायण कोठावळे संचालक मंडळ उपस्थित आहेत.
१५ संचालक व एक तज्ञ संचालक अशा १६ संचालकापैकी १५ संचालक उपस्थित असून विरोधी गटातील संचालक विजय मयेकर हे अनुपस्थित आहेत. सभासदांच्या गुणवंत मुलांचा, विद्यार्थी व निवृत्त सभासदांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विष्णू मोर्ये आणी आनंद राणे यांनी केले तर चेअरमन चंद्रकांत चव्हाण यांनी केले. निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच जनरल सभेला विरोधी गटाचे संचालक विजय मयेकर अनुपस्थित असल्याने नेमके का अनुपस्थित राहिले? याबाबत सभागृहात उलटसुलट चर्चा चालू होती.