आजगावच्या वेतोबा मंदिराचा वर्धापन दिन

Edited by: विनायक गांवस
Published on: May 14, 2025 15:32 PM
views 294  views

सावंतवाडी : आजगाव येथील श्री देव वेतोबा वर्धापन दिन रविवार १८ मे २०२५ रोजी होत असून या दिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ६:२५ वाजता अभिषेक, लघुरुद्र, आरती, दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, रात्रौ ८:०० वाजता पालखी व रात्रौ ठीक ८:३० वाजता 'मानी मराठा' नाटकाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन समस्त गावकर मंडळी व ग्रामस्थ आजगाव यांनी केले आहे.