श्री देव वशिक तळखंबा मंदिराचा वर्धापनदिन

विविध कार्यक्रमांचं आयोजन
Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 16, 2024 09:45 AM
views 151  views

देवगड : देवगड तालुक्यातील साळशी-गावकरवाडी येथील श्री देव वशिक तळखंबा मंदीराचा शुक्रवार १७ मे रोजी २४ वा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजता होम हवन व श्री सत्यनारायणाची महापुजा, दुपारी १२.३० वाजल्यापासून महाप्रसाद, तसेच संध्याकाळी वाजल्यापासून महाप्रसाद सायंकाळी ७ वाजता शिवकालीन मर्दानी खेळ. रात्री ८ वाजता बहारदार गाण्याचा कार्यक्रम रात्री ९.३० वाजता तोरसोळे (ता. देवगड) यांचे आई भगवती कला दिंडी वारकरी भजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे लाडगांवकर बंधू, श्री देव सिद्धेश्वर पावणाई इनाम देवस्थान ट्रस्ट साळशी, बारा- पाच मानकरी व ग्रामस्थ मंडळीनी कळविले आहे.