
वेंगुर्ले : कोकणचा तिरुपती म्हणून ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील श्री देव वेतोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा हजारो भाविकांच्या गर्दीत संपन्न झाला.महाराष्ट्र गोवा कर्नाटक या राज्यातील हजारो भाविक वेतोबा चरणी यावेळी लीन झालेले पहायला मिळाले. नवसाला पावणारा देव अशी ख्याती असून भाविक भक्त केळ्याच्या घडाचा नवस बोलतात आणी तो फेडतात. भक्ताच्या हाकेला धावणाऱ्या श्री देव वेतोबाचा वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम चार दिवस चालणार आहे.