
सावंतवाडी : ज्येष्ठ कडवट शिवसैनिक स्व. अनिल उर्फ आबा परुळेकर यांना सामाजिक बांधिलकी व ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळी यांच्याकडून केशवसुत कट्टा येथे आदरांजली अर्पण करण्यात आली. सोमवारी त्यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना उपस्थितांना भावना अनावर झाल्या.
केशवसुत कट्टा येथे अनिल उर्फ आबा परुळेकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली वाहत असताना अनिल परूळेकर यांच्यासोबतच्या सामाजिक राजकीय, साहित्यिक क्षेत्रातील कार्याचं स्मरण केले. प्रा. रूपेश पाटील, प्रा. नारायण देवरकर, फ्रान्सिस रॉड्रिक्स, भावना सिद्धये, प्रा. गिरीधर परांजपे, रवी जाधव, संजय पेडणेकर, श्री. पटेकर आदींनी मनोगत व्यक्त करत अनिल परूळेकर यांच्या सहवासातील आठवणी जागवल्या. यावेळी प्रा. सुरेश म्हसकर, मुकुंद वझे, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, प्रा. शैलेश नाईक आदींसह जेष्ठ नागरिक मित्र मंडळ व सामाजिक बांधिलकीचे सदस्य उपस्थित होते.