अनिल परब यांच्याविरोधात 420 चा गुन्हा

किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली माहिती
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 08, 2022 11:24 AM
views 536  views

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

अनिल परब यांनी खोटी कागदपत्रे सादर करत शासनाची फसवणूक केली असल्याचा ठपकाही किरीट सोमय्या यांनी ठेवला आहे. रत्नागिरीच्या दापोली येथे अनिल परब यांचं हे साई रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हे रिसॉर्ट आपलं नसल्याचं अनिल परब यांनी वारंवार स्पष्ट केलं असलं तरी हे रिसॉर्ट परब यांचंच असल्याचा दावा सोमय्या यांनी केलेला आहे.

किरीट सोमय्या यांनी अनिल परब  यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप करत काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर परब यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या. इतकंच नाही तर, परबांची तब्बल 13 तास चौकशी करण्यात आली होती.