आंगणेवाडीच्या भराडी मंदिरात वार्षिकोत्सवापर्यंत ओटी भरणे राहणार बंद

धार्मिक विधीमुळे निर्णय, सहकार्य करण्याचं आवाहन
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 02, 2024 17:50 PM
views 688  views

मसूरे : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर येथे 3 डिसेंबर 2024  ते सन 2025 या वर्षा मध्ये होणाऱ्या आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्या श्री देवी भराडी मातेच्या उत्सवा पर्यंत मंदिरात चालू असलेल्या धार्मिक विधी मुळे "ओटी भरणे, साडी चोळी(खण), नारळ(श्रीफळ) ठेवणे, नवस फेडणे, गोड पदार्थ ठेवणे, गाऱ्हाणी घालणे." इत्यादी सर्व विधी बंद ठेवण्यात आलेले आहेत. 

त्यामुळे वरील दर्शविलेले कोणतेही पुजा विधी साहित्य किंवा नवस फेडीचे साहित्य कृपया भाविकांनी मंदिरात दर्शनास येताना आणू नये. त्याचा स्वीकार मंदिरात केला जाणार नाही. आई भराडी मातेच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांनी याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.