वैभव नाईकांच्या विरोधात जुन्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद : योगेश तुळसकर

Edited by: भरत केसरकर
Published on: November 24, 2023 14:09 PM
views 473  views

कुडाळ : उबाठा सेनेचे आमदार वैभव नाईक हे गटातटाच राजकारण करत आहेत. दोन गट निर्माण करतात आणि या दोन गटांमध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न करतात. आणि या दोन्ही गटाचे मालक होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात जुन्या कार्यकर्त्यांमध्ये फार मोठी खदखद आहे. त्याची परिणीती म्हणजे रुपेश पावसकर यांनी दिलेला ओबीसी सेलच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा. आणि त्यांनी आमच्या शिवसेना पक्षात केलेला प्रवेश. त्यामुळे नजीकच्या काळात आमदार वैभव नाईक यांना याचा फटका बसणार असून 2024 मध्ये विधानसभेच्या कुडाळ मालवण मतदारसंघातील या निवडणुकीमध्ये वैभव नाईक हे पराभूत झाल्याशिवाय राहणार नाहीत. असा थेट इशारा शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश तुळसकर यांनी दिला आहे.

त्याचबरोबर रुपेश पावसकर यांचे कुडाळ तालुक्यात चांगले नेटवर्क असल्यामुळे त्याचा फायदाही शिवसेनेला पक्षाला होईल.या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून रूपेश पावसकर यांनी उबाठा सेनेला रामराम ठोकला आहे. मुख्यमंत्री 24-24 तास काम करत आहेत हे बघूनच रुपेश पावस्कर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. भविष्यात रुपेश पावसकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. असा दावा योगेश तुळसकर यांनी केला आहे.

शिवसेनेच्या गटबाजीवर त्यांनी जोरदार टीका करत एक प्रकारे आमदार वैभव नाईक यांना पराभवाचा फटका बसेल असाही थेट इशारा दिला आहे. यावेळी रूपेश पावसकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख योगेश उर्फ बंटी तुळसकर, शिल्पा शिरसाट, किशोर सावंत, नरेन्द्र नेरूरकर, धर्मा सावंत, परब आदी उपस्थित होते.