अंगणवाडी पर्यवेक्षिका विद्या गुरखे यांचे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत यश

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजन
Edited by:
Published on: February 16, 2025 18:55 PM
views 199  views

वैभववाडी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत पुर्व प्राथमिक गटातून वैभववाडी येथील अंगणवाडी पर्यवेक्षिका विद्या संतोष गुरखे यांनी चौथा क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत यश मिळविणाऱ्या त्या जिल्ह्यातील पहिल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका ठरल्या आहेत.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये ११०४ स्पर्धकांचा सहभाग होता. सिंधदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचेमार्फत जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या नवोपक्रम स्पर्धेत प्रथम व व्दितीय फेरीच्या सादरीकरणाअंती पुर्व प्राथमिक गटामधुन अंगणवाडी पर्यवेक्षिका शैलजा सगुण मातोंडकर यांनी प्रथम व अंगणवाडी पर्यवेक्षिका विद्या संतोष गुरखे यांनी व्दितीय क्रमांक क्रमांक मिळविला होता. त्यामुळे त्यांची राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी यांची निवड झाली होती. पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे अंतिम फेरीसाठी झालेल्या सादरीकरणामध्ये विद्या संतोष गुरखे यांनी विशेष प्राविण्य मिळवत चौथा क्रमांक पटकावून जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे.

या नवोपक्रम सादरीकरणासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ, तत्कालीन जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, 'डाएट'चे अधिव्याख्याता डॉ. संदीप पावर, गट विकास अधिकारी रामचंद्र जंगले, बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली काकडे याचे गुरखे यांना मार्गदर्शन लाभले. त्याच बरोबर उंबर्डे प्रभागातील अंगणवाडी सेविका, मदतनीस त्याचप्रमाणे प्रतिभा कोकरे व कुटुंबियांचे विशेष सहकार्य लाभले. राज्य स्तरावर मिळविलेल्या यशाबद्दल विद्या गुरखे यांचे जिल्ह्यात अभिनंदन केले जात आहे.