देवगडमध्ये अंगणवाडी मदतनीस मेगा भरती !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 07, 2024 13:13 PM
views 143  views

देवगड :  देवगड प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये रामेश्वर घरीवाडी, सौंदाळे बाऊळवाडी, दहीबांव कुपलवाडी, टेंबवली कालवी, आरे बोडदेवाडी, किंजवडे कोंडमा, चाफेड भोगलेवाडी, साळशी घाडीवाडी , वळीवंडे टापु, कुवळे घाडीवाडी, वाडा सडेवाडी, वाडा कसबेवाडी, वाडा वाडातर, सौंदाळे मांगरवाडी, दाभोळे पाटथर, मिठमुंबरी बागवाडी, मिठमुंबरी बौद्धवाडी, रामेश्वर अनपुर, विजयदुर्ग मुस्लीमवाडी, बापर्डे काळेश्वरवाडी, बापर्डे खैराटवाडी, मळेगांव विरमोडेवाडी, मुटाट बौद्धवाडी, नाडण वारीकवाडी, रहाटेश्वर कालवी , गोवळ तांबेवाडी , पोभुर्ले घाडीवाडी , कुणकवण बंदरवाडी, हिंदळे गिरावळ , खुडी खालचीवाडी, खुडी वाघदेवाडी , मुणगे लब्देवाडी , मुणगे सडेवाडी आदी गांवा मध्ये अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आह्रे. 

यावरील गावांतील इच्छुक पात्र महिला उमेदवारांनी दिनांक १ मार्च ते १२ मार्च २०२४ पर्यंत सुट्टीचा दिवस वगळुन देवगड बालविकास प्रकल्प कार्यालय पंचायत समिती देवगड येथे अर्ज करावा असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी देवगड श्री . बाबली होडावडेकर यांनी केल आहे .