
सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात येत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केसरकरांसह राणे कुटुंबावर तोंडसुख घेतले. दीपक केसरकर एकनाथ शिंदेंसोबत ही एकनिष्ठ राहणार नसुन ते भाजपात जाणार असल्याच मत त्यांनी व्यक्त केल. तर नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणेंवर टिका केला. तर आगामी काळात सिंधुदुर्गात उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुन्हा झेप घेईल. ४० आमदार जरी फुटले तरी शिवसैनिक आमच्या सोबत आहे असं मत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
यावेळी त्यांनी दीपक केसरकर यांच्यावर टीका करत असताना, दीपक केसरकर जनतेमध्ये गेल्यावर आई- वडीलांची विचारपूस करतात. यावर टोला हाणताना आई-बाबा कसे आहेत ? ह्या केसरकरांच्या कार्यपद्धतीच उदाहरण देत मिश्किल टिपण्णी केली. दरम्यान, भाजपच्या महिलांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेर जावून दाखवा असा इशारा दिला त्याबद्दल विचारल असता, मी घाबरले ! अशी प्रतिक्रिया देत, मी चळवळीतील कार्यकर्ती आहे. मी अबला नारी नाही, कुणाच्या दहशतीला मी भिक घालत नाही अस मत त्यांनी व्यक्त केल. तर उद्धव ठाकरेंवर जी मी टीका केली ती मी मान्यच करते. तो भुतकाळ होता. पण, मी उघडपणे सांगतेय तसं देवेंद्र फडणवीस सांगाणार का ? राणेंवर विधानपरिषदेत केलेल्या त्या टिकेनंतर आता राणेंची गळाभेट घेणारे फडणवीस त्याबद्दल का बोलत नाही ? असं मत अंधारेंनी व्यक्त केले. यावेळी उपनेत्या संजना घाडी, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हा संघटक जानवी सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, मायकल डिसोजा, बाळा गावडे, आबा सावंत, योगेश नाईक, शब्बीर मणियार, शैलेश गवंडळकर आदी उपस्थित होते.