
सावंतवाडी : सावंतवाडीतील अँड. प्रा. अरुण पणदूरकर यांचा सामाजिक कार्यात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते "गोमंतक (गोवा) जीवन गौरव 2023" हा विशेष पुरस्कार देऊन खास गौरव करण्यात आला. श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर समर्थगड, मडगाव, गोवा" येथे पाचव्या राष्ट्रीय गोमंतक (गोवा) गौरव पुरस्कार सोहळा 2023 मध्ये केला गेला.
या खास सोहळा हुतात्मा अपंग बहूउद्देशिय विकास कल्याणकारी संस्था, कराड कार्यक्षेत्र संपूर्ण भारत यांच्या तर्फे व श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर समर्थगड, मडगाव, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला होता.
या विशेष कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या सोबत प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र सावईकर खासदार दक्षिण गोवा, उल्हास तुयेकर विद्यमान आमदार, ऍड. सौ. आशा देसाई, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली तसेच शाहू महाराज स्वामी समर्थ मंदिर प्रमुख, महेश थोरवे, उदय बने रत्नागिरी, जयेश नाईक अध्यक्ष स्वामी समर्थ विद्यामंदिर समर्थगड, मडगाव, गोवा व डॉ. सुनील फडतरे संस्थापक अध्यक्ष हुतात्मा अपंग बहूउद्देशिय विकास कल्याणकारी संस्था यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया थाटात संपन्न झाला. हुतात्मा अपंग बहूउद्देशिय विकास कल्याणकारी संस्थेतर्फे संपूर्ण भारताच्या कार्यक्षेत्रामधून दिला जाणारा हा "गोमंतक (गोवा) जीवन गौरव 2023" हा विशेष सत्कार मानाचा समजला जातो.
या विशेष पुरस्काराबद्दल ऍड. प्रा. अरुण पणदूरकर यांनी पुरस्कार निवड समिती व हुतात्मा अपंग बहूउद्देशिय विकास कल्याणकारी संस्था, कराड कार्यक्षेत्र संपूर्ण भारत यांच्या व श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर समर्थगड, मडगाव, गोवा याचे मन:पूर्वक आभार मानले आहे व आपले सामाजिक कार्य करण्याचा घेतलेला वसा असाचा पुढे चालू ठेवण्याचे अभिवचन दिलेले आहे.