अनधिकृत सिलीका उत्खननाची चौकशी करुन कारवाई करावी : अनंत पिळणकर

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 29, 2023 14:28 PM
views 109  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील कासार्डे नागसावंतवाडी येथील होत असलेल्या अनधिकृत सिलीका उत्खननाबाबत राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी आज तहसीलदार यांना निवेदन सादर केले.

कणकवली तालुक्यातील कासार्डे नागसावंतवाडी येथील इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये अवैध उत्खनन चालू आहे. सदर उत्खनानाबाबत आपलेकडून योग्य ती सखोल चौकशी करुन कारवाई करणेत यावी. व संबंधितावर शासन नियमातील प्रचलीत तरतुदीनुसार योग्य ती दंडनिय कारवाई करावी तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील अन्य कोणत्याही ठीकाणी सिलीका वाळू अगर अन्य कोणत्याही प्रकारचे अनधिकृत उत्खनन अथवा अनधिकृत गौण खनिज वहातूक होत असल्यास संबंधितावर शासन नियमातील प्रचलीत तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करणेत यावी. तसेच यापुढे अनधिकृत अवैध उत्खनन होऊ नये म्हणून आपले कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना सुचना देण्यात याव्यात.

तसेच या बाबत भरारी पथक नेमूण योग्य ती संबंधितावर कारवाई करणेत यावी. यापूर्वी भरारी पथक नेमून कोणतीही कारवाई झालेली नाही. राजरोसपणे अवैध उत्खनन व वहातूक चालू आहे हे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या आशिर्वादाने चालू आहे. तरी याबाबत त्वरीत कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिंपळकर यांनी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना सादर केले आहे‌