अनंत पिळणकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 04, 2024 14:56 PM
views 133  views

कणकवली : राष्ट्रवादी पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष आणि नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते अनंत पिळणकर हे गेली 20 वर्षाहून अधिक काळ सिंधुदुर्ग च्या राजकीय आणि सामाजिक पटलावर कार्यरत आहेत. रोखठोक स्वभावाचे पिळणकर हे राजकारणासोबतच आपली सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तीमत्व म्हणून सुपरिचित आहेत. वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करुन त्यांनी सामाजिक दायित्व जपले आहे.आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून रक्तदान शिबीर आयोजित करुन  सामाजिक ऋण व्यक्त केले आहे.रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे.असा संदेश वाढदिवसाच्या निमित्ताने अनंत पिळणकर यांनी दिला आहे.रक्तदान शिबिराचे आयोजन करुन सामाजिक बांधिलकी जपताना समाजासमोर एक वेगळा आदर्श पिळणकर यांनी ठेवला आहे.असे प्रतिपादन कुर्ली गावचे सुपुत्र आणि उद्योजक दिपक कदम यांनी केले. ते अनंत पिळणकर यांच्या नवीन कुर्ली वसाहत येथील निवासस्थानी रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी त्यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी कणकवली राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आणि नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर, चंद्रशेखर रावराणे ,विलास वाघराळकर ,संजना गुरव ,सुरेश रावले , निलेश रावराणे ,विशाल रावराणे , रमेश रावराणे, प्रीतम रावराणे, अवि सापळे, सत्यवान सुतार, उत्तम तेली, महेश चव्हाण ,बंडू शेणवी, अमित लाड ,दिलीप वालावलकर, संतोष वाडकर, देवेंद्र पिळणकर, तुषार पिळणकर यांच्यासह ओरोस जिल्हा रुग्णालय रक्तपेढी सिंधुदुर्ग चे वैद्यकीय अधिकारी पल्लवी सुरवसे, मयुरी शिंदे टेक्निशियन, प्रांजली परब अधिपरिचारिका, पूजा हरमलकर प्रयोगशाळा सहाय्यक नितीन गावकर वाहन चालक, प्रथमेश घाडी, मिलिंद कांबळी, यांच्यासह अनंत पिळणकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.