
कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी (शरद पवार गट) कणकवली तालुका अध्यक्षपदी अनंत पिळणकर यांना विधी मंडळाचे विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज नियुक्तीपत्र दिलं. सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असलेल्या पिळणकर यांनी जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीला जिल्ह्यात ऊर्जितावस्था आणली.
अनंत पिळणकर यांच्या संघटनात्मक कामाची दखल घेत, पक्ष श्रेष्ठीनी अनंत पिळणकर यांची कणकवली तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे.