RPD हायस्कूलमध्ये आनंदोत्सव !

Edited by: विनायक गावस
Published on: December 14, 2023 15:29 PM
views 324  views

सावंतवाडी : शहरातील मोती तलावाच्या शेजारील आर.पी.डी हायस्कूलमध्ये ''आनंदोत्सव'' २०२३ च आयोजन करण्यात आलं आहे. प्रदर्शन व खरेदी अशा स्वरूपाचा हा आनंदोत्सव २८,२९, ३० डिसेंबर २०२३ पर्यंत चालणार आहे. दुपारी ३ ते रात्री ९ पर्यंत या आनंदोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे. यात डिझायनर कपड्यांसह मालवणी खाद्यपदार्थांची चव चाखता येणार आहे. तर ऐतिहासिक गंजिफा खेळ प्रत्यक्षात खेळण्याची संधी याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


या आनंदोत्सवामध्ये डिझायनर साड्या, डिझायनर कपडे, ज्वेलरी, इंटेरिअर प्रॉडक्ट्स, मसाले, टॅरो कार्ड रिडर, पॉटरी, पेंटीग्स, रेडीमेड ड्रेस, मालवणी खाद्यपदार्थ स्टॉल लाईव्ह पोट्रेट, कॅरिकेचर, टॅटु व मेहेंदी स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. सावंतवाडीकरांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. तर गंजिफा हा १६ व्या शतकातील प्राचिन खेळ जो खेळ भारताच्या राजघराण्यांत खेळला जात होता, तोच खेळ २९ डिसेंबर २०२३ रोजी सांय ५.०० वा. सावंतवाडी राजघराणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास मिळणार आहे. यावेळी उपस्थित राहून आनंदोत्सवाचा आनंद घेण्याच आवाहन आयोजिका पौर्णिमा रविकांत सावंत यांनी केल‌ आहे.