आनंदीबाई रावराणे महाविद्यलयास पॉवर लिफ्टींगमध्ये सुवर्णपदक

Edited by:
Published on: December 09, 2024 16:34 PM
views 197  views

वैभववाडी : मुंबई विद्यापीठ अंतर्गत आयोजित महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या हर्ष अभिजित सावंत याने सुवर्णपदक पटकावले आहे.कल्याण येथील  कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोवेली येथे रविवारी ८ डिसेंबर रोजी ही  स्पर्धा पार पडली. 

मुंबई विद्यापीठच्या महाविद्यालयीन स्पर्धा कल्याण येथे सुरू आहेत.या  स्पर्धेमध्ये  १०५ ते १२० किलो वजनी गट पॉवर लिफ्टींगमध्ये हर्ष सहभागी झाला होता.या गटामध्ये त्याने एकूण ६१३ किलो वजन उचलून या गटातून सुवर्णपदक प्राप्त केले. हर्ष सावंतचे संस्थापदाधिकारी, प्र.प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.