कणकवलीत भरतोय आनंद मेळा

रोटरी क्लबच्या माध्यमातून 10 ते 22 मार्च पर्यंत विविध कार्यक्रमांचे केले आयोजन
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 08, 2023 16:22 PM
views 190  views

कणकवली : रोटरी क्लब कणकवलीतर्फे रोटरी आनंद मेळा आयोजित करण्यात आला असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर १० ते २२ मार्च या कालावधीत ‘रोटरी आनंद मेळा भरणार आहे.यानिमित्त विविध स्पर्धा व संगीत रंजनीचा कार्यक्रम होणार आहे. या मेळ्याचे उद्घाटन शुक्रवार १० रोजी सायंकाळी ६ वा. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी रोटरीचे गव्हर्नर व रोटरीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती रोटरी क्लबच्या अध्यक्षा वर्षा बांदेकर व आनंद मेळ्याचे इव्हेंट मॅनेजर ॲड. दीपक अंधारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. कणकवली येथे पत्रकार परिषद घेत रोटरी आनंद मेळाबाबत माहिती देण्यात आली यावेळी रोटरी क्लबच्या उपाध्यक्ष उमा परब, खजिनदार माधवी मुरकर, मेघा गांगण,सीताराम उर्फ दादा कुडतरकर, अनिल कर्पे, गुरु पावसकर, रवी परब, नितीन बांदेकर, धनंजय कसवणकर, दीपक बेलवलकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष समीर नलावडे यांची संकल्पनेतून रोटरी क्लबतर्फे १० ते २२ मार्च या कालावधीत आनंद मेळा आयोजित केला आहे. या कालावाधीत दररोज सायंकाळी ६ ते १० यावेळेत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. शुक्रवार १७ मार्च रोजी महिलांसाठी ‘मला पैठणी जिंकायची आहे’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. शनिवार १८ मार्च रोजी भारतीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा युवक गट, खुला गट, युवती गट, खुला गटांत होईल. त्यानंतर डॉग शो, पपी शो, कॅटल शो होईल. रविवार १९ मार्च रोजी रेकॉर्ड डान्स स्पर्धा होईल. ही स्पर्धा बाल व किशोरवयीन गटांत होईल. त्यानंतर ३ ते ८ वयोगटातील मुली व मुलींसाठी वेशभूषा स्पर्धा होईल. दिव्यांग मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. सोमवार २० मार्च रोजी ‘मेरी आवाज सुनो’ ही स्पर्धा होणार असून ही स्पर्धा बाल किशोर, खुला गटांत होईल. २१ मार्च रोजी स्टैंडअप कॉमेडी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण अजित कोष्टी करणार आहे. या स्पर्धेनंतर अजित कोष्टी यांचा कॅमेडी शो होणार आहे. गुढीपाडव्यादिवशी २२ रोजी बुधवारी ६ ते १० यावेळेत ऑकेस्ट्राने या मेळयाचा समारोप होईल, अशी माहिती ॲड.दीपक अंधारी यांनी दिली. या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी लता राणे, संध्या पोरे, धनंजय कसवणकर, डॉ. सुहास पावसकर, तृप्ती कांबळे, राजश्री रावराणे, संतोष कांबळे, भेराराम राठोड, दिशा अंधारी, दीपक अंधारी, प्रमोद लिमये, मेघा गांगण, दादा कुडतरकर, नितीन बांदेकर, अनिल कर्पे यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचे ॲड.अंधारी यांनी सांगितले, आनंद मेळयानिमित्त ४० खाद्यपदार्थासह अन्य ४० असे एकूण ८० स्टॉल उभारले जाणार आहेत. सामाजिक बांधिलकीतून रोटरी क्लब कणकवलीने हा आनंद मेळा आयोजित केला आहे. या मेळाच्या माध्यमातून अबालवृद्धांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्लॅटफार्म उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यांच्याकरिता ग्रुप डान्स, सोलो डान्स, लावणीनृत्य यासह विविध स्पर्धा होणार आहेत. कणकवलीकरांनी या आनंद मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन रोटरी क्लबच्यावतीने करण्यात आले आहे