आनंदाचा शिधा उपक्रमाचा शहरात शुभारंभ

Edited by: विनायक गांवस
Published on: April 13, 2023 14:02 PM
views 109  views

सावंतवाडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘ आनंदाचा शिधा ‘ उपक्रमाचा शुभारंभ सावंतवाडी शहरातील उभा बाजार येथील संजय मुळीक यांच्या रास्त दराच्या धान्य दुकानात करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आनंद नेवगी व भाजपचे युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उभाबाजार परिसरातील नागरीक व ग्राहक उपस्थित होते.