
सावंतवाडी : चराठा ग्रामपंचायतच्या सदस्या ॲना विल्सन डिसोजा यांनी आज अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. सावंतवाडी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, सरपंच प्रचिती कुबल, उपतालुका प्रमुख संजय माजगावकर, शाखा प्रमुख राजन परब, उपविभाग प्रमुख राजू कुबल, क्लेटस फर्नांडिस, बूथ प्रमुख प्रशांत बिर्जे, अण्णा कोठावळे, रोहित परब, श्रावणी बिर्जे, बाळू वाळके, संतोष खरात, गौरी गावडे, एना लुसिझा डिसोझा आणि रुंदा मेस्त्री यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. ॲना डिसोजा यांच्या प्रवेशाने चराठा परिसरात शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.