मोती तलावात आढळलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटली

Edited by: विनायक गांवस
Published on: May 26, 2024 14:38 PM
views 78  views

सावंतवाडी : शहरातील मोती तलावात अज्ञाताचा मृतदेह आढळून आला होता. ही घटना रविवारी उघडकीस आली. या अज्ञाताची ओळख पटली असून खेमाजी बाबुराव खंदारे (वय ७८) असे त्यांचे नाव आहे. भटवाडी भागात तो राहत होते.

आज सकाळी बाजारातून जाऊन येतो असे सांगून ते घरातून निघाले होते. पण उशिरापर्यंत ते घरी न आल्यानं कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. यातच अज्ञात मृतदेह मोती तलावात  आढळून आल्यान पोलिसांनी चौकशी केली असता मृतदेहाची ओळख पटली. त्यांचा मुलगा मुंबईत राहत असल्यामुळे ते आपल्या पुतण्याकडे भटवाडी येथे राहत होते. गेल्या काही दिवसापूर्वी त्यांचा अपघात झाल्यामुळे ते आजारी होते. मुलगा आल्यानंतर उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.