एक छत्री गरजू विद्यार्थ्यासाठी, दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना केले छत्र्यांचे वाटप
Edited by: विनायाक गावस
Published on: July 06, 2023 11:43 AM
views 211  views

सावंतवाडी : दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत ' एक छत्री गरजू विद्यार्थ्यांसाठी' या अभिनव उपक्रमांतर्गत  न्यू इंग्लिश स्कूल, हळदीचे नेरूर हायस्कूल, देवसू हायस्कूल, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा देवसू, रवळनाथ पावणाई हायस्कूल शिरशिंगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळदीचे नेरूर (तिवरवाडी), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडुर खरारे येथील ३६ गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले.

न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर हायस्कूल मधील ६ विद्यार्थ्यांना, देवसू हायस्कूलच्या २ विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा देवसूच्या ७ विद्यार्थ्यांना, रवळनाथ पावणाई हायस्कूल शिरशिंगे मधील १२ विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळदीचे नेरूर (तिवरवाडी) च्या ६ विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडुर खरारे च्या ३ गरजू विद्यार्थ्यांना दुर्ग मावळा परिवारातर्फे छत्री वाटप करण्यात आले.

या छत्री वाटप उपक्रमासाठी संतोष नेरुरकर यांनी २ छत्र्या, विद्या बांदेकर यांनी २ छत्र्या, राजाराम फर्जंद ५ छत्र्या, श्री समर्थ एक्वा सेल्स अँड सर्व्हिसचे प्रोपा हनुमंत नाईक व सचिन देसाई यांनी १० छत्र्या, सचिन देसाई यांनी ५ छत्र्या, सहदेव घाडीगांवकर ३ छत्र्या, ओवी बापू मेस्त्री ५ छत्र्या, यशवंत मेस्त्री २ छत्र्या, हेमांगी जोशी २ छत्र्या सौजन्य केले.दरम्यान सर्व दात्यांचे दुर्ग मावळा परिवाराकडून विशेष आभार मानले आहेत. गरजूंना मदत करताना छायाचित्र काढणे योग्य नसलेने सदर उपक्रमाचा फोटो काढण्यात आलेला नाही.  या उपक्रमात सहभागी होण्यासाठी  सामाजिक कार्यकर्ते तसेच दात्यांना असे गरजू विद्यार्थी शोधण्यासाठी मदत करून  अथवा या उपक्रमासाठी एक छत्री देऊन सहकार्य करू शकता. छत्री सौजन्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींना छत्री वाटप केलेल्या शाळा व विद्यार्थ्यांचे नाव वैयक्तिक पाठवण्यात येईल. या उपक्रमाच्या अधिक माहिती साठी खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधा अथवा Whatsapp च्या माध्यमातून संदेश पाठवावा असे दुर्गमवळा प्रतिष्ठानचे  गणेश नाईक यांनी कळविले आहे. 

संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे - ९८६०२५२८२५, ९४२२२६३८०२