
देवगड : देवगड येथील मुणगे ग्रामपंचायत कार्यालय मद्ये पूर्ववैमन्यासतून झालेल्या वादात मुणगे वाघोली वाडी येथील ३५ वर्षीय तरुण दिगंबर राजेंद्र महाजन जखमी झाल्याची घटना ६जून १२.१५ च्या दरम्याने मुणगे ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी घडली या घटनेसंदर्भात देवगड पोलीस स्थानकात रीतसर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेत फिर्यादि दिगंबर राजेंद्र महाजन यांच्या डोकीला खुर्ची मारल्याने दुखापत झाली आहे. या घटने संदर्भात या घटनेतील संशयित आरोपी योगेश प्रकाश सावंत वय (४०) प्रकाश शिवाजी सावंत वय (६०) मनोज सखाराम सावंत (३८)मुलगी सावंतवाडी यांच्याविरुद्ध भादवी कलम ३२४,३२३,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम करीत आहेत .