
सावंतवाडी : महावाचन उत्सव हा शासनाचा अभिनव व स्तुत्य उपक्रम आहे. या निमित्ताने मोबाईलमध्ये अडकलेली मुलं नक्कीच बाहेर येतील. वाचनाची गोडी त्यांना लागेल. स्पर्धेमुळे अधिक हुरूप येईल, दै. कोकणसादने यासाठी पुढाकार घेतल्याने आपलही कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं प्रतिपादन मदर क्विन्स स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगावकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाचन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.याचा शुभारंभ मदर क्विन्स स्कुलमध्ये करण्यात आला. तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीत देखील याचा आरंभ प्राचार्य डॉ.दिलीप भारमल यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर, शिक्षिका अस्मिता परब आदी उपस्थित होते.