देवगडच्या मोर्वे शाळेत भरलं रानभाज्यांचे प्रदर्शन !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 08, 2023 17:59 PM
views 167  views

देवगड  : मुलांना रानभाज्यांविषयी समजावे व पावसाळ्यात आपल्या आजूबाजूच्या परिसरात रुजून येणाऱ्या रानभाज्यांची माहिती मिळावी म्हणून पूर्ण प्राथमिक जीवन शिक्षण शाळा हिंदळे मोर्वे येथे रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्र प्रमुख नामदेव सावळे यांच्या हस्ते फीत कापून तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद सारंग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

मुख्याध्यापक पांडुरंग नाडगौडा शिक्षक प्रवीण सावरे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत परिसरातील रानभाज्यांची माहिती देत त्यांचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आहारात तसेच पोषण आहारात यांचा समावेश असावा असे आवाहन पालक वर्गाला केले. विविध आजारांवर मात करण्यासाठी आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारामध्ये रानभाज्यांचे महत्त्व याबाबतचे मार्गदर्शन माजी उपसरपंच कंकांद्रीत लोणे यांनी केले, टाकळा,कुर्डू,कारली,करटोली कटला पेवगा अळू या सारख्या विविध प्रकारच्या भाज्या मांडण्यात आल्या . यावेळी हिंदळे केंद्राचे केंद्रप्रमुख नामदेव सावळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद विष्णू सारंग,माजी उपसरपंच कंकाद्रीत लोणे, शतक महोत्सव समिती अध्यक्ष प्रकाश तळवडकर, ग्रामपंचायत सदस्य महेश कोळंबकर,कीर्ती गांवकर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक तसेच पालक संघाचे सदस्य माता पालक संघाचे सदस्य व ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते.