
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील झरे १ ग्रामपंचायत सरपंच श्रुती देसाई यांच्या संकल्पनेतून यावर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. देश रक्षणासाठी सीमेवर सेवा बजावून आलेल्या माजी सैनिकांना ग्रामपंचायत ध्वजारोहणाचा सन्मान देत महिला सरपंच श्रुती देसाई यांनी सर्वांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
सरपंच देसाई व त्यांच्या सहकारी वर्गाने फक्त स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणच नाही तर गावातील निमंत्रित केलेल्या व उपस्थित राहिलेल्या सर्व माजी सैनिकांची ११ दिव्यांनी स्वतः व उपस्थित महिला वर्गाने ओवाळणी करून देश रक्षणासाठी योगदान देणाऱ्या शुरांना आगळीवेगळी सलामी दिली. यावेळी माजी सैनिक रामचंद्र विठोबा सावंत उदय लाडू सावंत, हरिभाऊ देसाई, कृष्णा रामा ठाकूर, विष्णू यशवंत कविटकर, श्रीधर लुमाजी सावंत, कैतान अन्टोन डिसोजा, अनुसया शशिकांत देसाई, मेरी अन्टोन डिसोजा, भिकाजीं घुमे, नारायण राजाराम कविटकर आदी माजी सैनिक उपस्थित होते. ग्रामपंचायतचे उपसरपंच अर्जुन आयनोडकर, जेष्ठ मार्गदर्शक मधुकर विठ्ठल सावंत, ग्रा. प. चे सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका अर्पिता अरुण सावंत, आरोग्य सेवक शैलेश लोंढे, आरोग्य सेविका संजीवनी गवस, आशाताई वैभवी सावंत, CRP संजना सावंत, डॉ. सोनम शेटकर, ग्रामसेवक खानोलकर व ग्रामस्थ झरे 2 मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी सरपंच यांच्या या संकल्पनेचे कौतुक करून या कार्यक्रमालाही विशेष दाद दिली.