माणुसकीला काळिमा फासणारी घटना

मुलाने आईचा केला खून
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 15, 2024 08:21 AM
views 1107  views

सिंधुदुर्गनगरी : कसाल बौद्धवाडी येथे राहत असलेल्या मनोरमा मोहन कदम ( ५८ ) हीचा तिचा मुलगा सुरेंद्र मोहन कदम ( ४० ) याने गळा दाबून खून केल्याची घटना सोमवारी रात्री उघड झाली आहे.  आईचा खून केल्यानंतर बॅग भरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलीस दाखल झाल्याने आरोपी मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात घेतलं.

बाजारात जाण्यावरू झालेल्या वादातून खून केल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातीला हाताने मारहाण केल्यावर घरातून पळून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या आईला घराबाहेर पकडून पाण्याच्या दोरीच्या सहाय्याने गळा  दाबून खून केल्याची माहिती मिळते.