देवगड तालुक्यात दुपारपर्यंत सरासरी ३८ % मतदान..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 05, 2023 14:06 PM
views 49  views

देवगड : देवगड तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दुपारपर्यंत सुमारे अडतीस टक्के मतदान झाले आहे. तालुक्यामध्ये रामेश्वर, फणसगाव, विठ्ठलादेवी, ठाकूरवाडी, शिरवली, वळिंवंडे, पावणाई, तिरलोट, वानीवडे, या ग्रामपंचायतीच्या 26 मतदान केंद्रावर आज सकाळपासून पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. आज सकाळी साडे अकरा पर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या सर्व नवही ग्रामपंचायतीसाठी सरासरी 38.43 टक्के मतदान झाले आहे. मतदारांमध्ये महिलांनी जास्त सहभाग दर्शवला असून आपापली मते मतपेटी टाकण्यासाठी राजकीय व स्थानिक कार्यकर्ते कामाला लागले आहेत.