
सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाचन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.याचा शुभारंभ कळसुलकर इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक सुर्यकांत भुरे म्हणाले, महावाचन उत्सव राबविण्यासाठी मंत्री दीपक केसरकर व शासनाचे आम्ही आभारी आहोत. वाचन संस्कृतीमुळे अवांतर वाचनाची ओढ मुलांना निर्माण होईल. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल असं मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या उपस्थित या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. याप्रसंगी कळसुलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुर्यकांत भुरे, सांस्कृतिक प्रमुख श्री. ठाकर, मराठीच्या शिक्षिका श्रीम.कदम, लिपीक श्रीम. केसरकर, संस्थेच्या लिपिक श्रीम. नाईक आदी उपस्थित होते.