'आरपीडी' प्रशालेत ४ जानेवारीला 'अमृतोत्सव !'

स्नेहसंमेलन, वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम रंगणार
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 02, 2023 21:38 PM
views 190  views

सावंतवाडी :  शहरातील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे 'अमृतोत्सव' वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण, आदर्श शिक्षक, आदर्श विद्यार्थी पुरस्कार तसेच विशेष सत्कार म्हणून साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांचा सत्कार आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम बुधवार दिनांक ४ जानेवारी व गुरुवार दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था चालक संघ तथा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेडचे उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर असणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत भूषविणार आहेत. यावेळी कार्यक्रमास तरी सावंतवाडीतील शिक्षण प्रेमी, पालक, शिक्षक, व विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक जगदीश धोंड, उपप्राचार्य प्रा. डॉ. सुमेधा नाईक, उपमुख्याध्यापक शेखर नाईक, पर्यवेक्षक अरविंद साळगावकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख पूनम कदम, प्रा. रणजीत माने, विद्यार्थी प्रतिनिधी अविष्कार डिचोलकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी दीपाली राऊळ, सांस्कृतिक मंत्री क्रांती मडगावकर, मुख्यमंत्री सत्यम पेडणेकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी वैष्णवी धुमक, सांस्कृतिक मंत्री सार्थक वाटवे, आदींनी केले आहे.

 दरम्यान स्नेहसंमेलन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रंगावली प्रदर्शन व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार असून विविध गुणधर्म कार्यक्रम, फनी गेम्स व विविध स्पर्धा, शेलापागोटे कार्यक्रम संपन्न होणार असल्याने कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, संचालक शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी, शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी, पालक आणि हितचिंतक यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे,