देवगड पं.स.ची अमृत कलश यात्रा ठरली लक्षवेधी !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 11, 2023 20:04 PM
views 254  views

देवगड : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभ निमित्ताने पंचायत समिती देवगडच्या वतीने 'मेरी मिट्टी मेरा देश ' अभियानअंतर्गत तालुकास्तरीय अमृत कलश यात्रा मोठया उत्साहात संपन्न झाली.सकाळी ९ .४५ वाजता  दाभोळ तिठा येथुन सुरू झालेल्या अमृत कलश यात्रेत माजी आमदार अजित गोगटे , गटविकास अधिकारी .जयप्रकाश परब, तहसिलदार रमेश पवार, पोलिस निरीक्षक देवगड निळकंठ बगळे, सहा . पोलीस निरीक्षक कांबळे, सहायक गटविकास अधिकारी निलेश जगताप, अधिक्षक कुणाल मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कलश यात्रेसाठी मोटारसायकल रॅलीत तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.प सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रा.प. कर्मचारी, गावस्तरीय माती संकलन केलेले अमृत कलश घेऊन सहभागी झाले होते . तसेच इंद्रप्रस्थ हॉल येथे रॅलीचा समारोप होऊन गावस्तरीय संकलित केलेली माती तालुक्यातील अमृत कलशामध्ये  मान्यवरांच्या हस्ते संकलित करण्यात आली. यानंतर मान्यवरांचा तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत विशेष कामगिरी केलेल्या  ग्राम पंचायतींचा व लाभार्थ्याचा सत्कार करण्यात आला. पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे,प्रमुख पाहुणे माजी आमदार अजित गोगटे, माजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन ,जिल्हा परिषद सिंधुदुर्ग राजेंद्र पराडकर , गटविकास अधिकारी जयप्रकाश परब आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

याप्रसंगी सेवानिवृत्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर व दोडामार्गाचे माजी सभापती महेश गवस यांच्या हस्ते ११ ग्रामपंचायतींच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यामधे शेठ म ग हायस्कूल देवगड,इंग्लिश मिडीयम स्कूल देवगड,पंचायत समिती देवगड महिला कर्मचारी, नारायण चव्हाण सर गट साधन केंद्र ,इत्यादी कलाकारांनी अप्रतिम कार्यक्रम सादर केले .त्याला उपस्थितांनी चांगली दाद दिली.

        या संपुर्ण कार्यक्रमाला माजी आमदार अजित गोगटे , गटविकास अधिकारी जयप्रकाश परब , तहीलदार रमेश पवार,पोलिस निरीक्षक देवगड निळकंठ बगळे, सहा .पोलीस निरीक्षक कांबळे, सहायक गटविकास अधिकारी निलेश जगताप, बाल विकास प्रकल्प अधिकारी समिर होडावडेकर ,सहा.प्रशासन अधिकारी तोष बिर्जे, कृषि अधिकारी दिगंबर खराडे, अधिक्षक कुणाल मांजरेकर, अधिक्षक मेधा राणे, सचिन जाधव, नियोजनात विशेष मार्गदर्शक विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) अंकुश जंगले, ग्रामविकास अधिकारी  रामदास हडपिडकर ,ग्रामसेवक पाडुरंग शेटगे , वरीष्ट सहाय्यक स्वप्नजा बिर्जे , ग्रामसेवक श्री . गुणवंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते . 

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनी केले ,सुत्रसंचालन स्वाती हिंदळेकर मॅडम तर आभार सचिन जाधव सर यांनी मानले .