
कणकवली : वरवडे ग्रामपंचायत उपसरपंचपदी अमोल बोंद्रे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.उपसरपंचपदासाठी निर्धारित वेळेत अमोल बोंद्रे यांचे एकमेव नामनिर्देशन दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी मणेरीकर यांनी अमोल बोन्द्रे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. नूतन उपसरपंच अमोल बोन्द्रे यांचे भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांनी अभिनंदन केले.यावेळी ग्रामविस्तार अधिकारी विश्वास पावसकर, माजी सरपंच भाई बांदल , माजी सरपंच भाई बोन्द्रे, प्रमोद गावडे ,सिरील फर्नांडिस , स्वप्नाली सावंत, सदा घाडीगांवकर , सारिका लाड , सलीम खोत , इरफान खोत , विजय कदम , संतोष कदम , हसन खोत , शिवराम परब , सुनील परब , विजय सावंत ,राजू बांदल , स्वप्नील परब , दशरथ घाडीगांवकर विनायक मेस्त्री , मंगेश मेस्त्री , हनुमंत बोन्द्रे , सुनील सादये , मंगेश घाडीगांवकर , इरफान खोत , सादिक कुडाळकर , रुपेश वरवडेकर , अमित जाधव , सिद्धार्थ कदम आदी उपस्थित होते.