
रत्नागिरी : इंडिया आघाडी ही औरंगजेब फॅन क्लब आहे असा हल्लाबोल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केला. रत्नागिरी येथील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सभेत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब आहे. त्यामुळे विकासाला मत देणार की बिर्याणीला ? असा सवाल त्यांनी केला. तर ३७० कलम, ट्रीपल तलाक, औरंगाबादच्या संभाजीनगरला विरोध करणारी ही मंडळी आहेत. त्यामुळे ज्यांच्या अजेंड्यात या गोष्टी हटविण्याचा विचार आहे त्या कॉग्रेसला उद्धव ठाकरे साथ देणार का ? असा सवाल करत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जनता महायुतीला, मोदींना साथ देणार की औरंगजेब फॅन क्लबला सहकार्य करणार असा प्रश्न अमित शहांनी उपस्थित केला.