
सावंतवाडी : फक्त निवडणुका आल्या की घोषणा करायच्या, रोजगाराची आश्वासने फलित शून्य. आडाळी MIDC लाल फितीत अडकली आहे. कुडाळ MIDC ची अशीच अवस्था आहे. सिंधुदुर्ग मध्ये महाराजांच्या पुतळा कोसळल्यानंतर झालेली स्टेटमेंट अत्यंत खेदजनक, यामुळे येत्या काळात बदल गरजेचा. आणि हा बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अर्चना घारे यांच्या उमेदवारीच्या तयारीला जोमाने लागूयात असं राष्ट्रवादी श. प. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आवाहन केलं.