
सावंतवाडी : आज नव्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. परिवर्तनाच्या लाटेवर आता हा मतदार संघ उभा आहे. ५ वर्ष झाली एकही कारखाना उभा राहिला नाही. अनेक घोषणा निवडणुकीपूर्वी केल्या जातात. आम्हाला आज पर्यंत सक्षम लोकप्रतिनिधी मिळाला नाही. एकही कंपनी सुरू होऊ शकली नाही. छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला त्यावेळी संपुर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच लागली. बरेच प्रश्न आहेत या मतदार संघात त्यामुळे आता नवीन परिवर्तनासाठी तयार राहूया व हा मतदार संघ महाविकास आघाडी व राष्ट्रवादीकडे येण्यासाठी सज्ज होऊया असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले.