
सावंतवाडी : भाजपचे प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार अमित गवंडळकर व मेघा दुबळे यांनी आज दैवज्ञ गणेश मंदिरात श्रीफळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी भाजप शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर उपस्थित होते.
श्री. गवंडळकर यांनी पक्षाने माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली, याबद्दल मी सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. प्रभागातील गोरगरिबांच्या समस्या समजून घेण्यासाठी मी थेट त्यांच्या दारी जाईन, जास्तीत जास्त मतांनी विजयी होण्यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजप शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, अतुल पेंढारकर आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.











